ध्वनी: ध्वनीची निर्मिती

प्रस्तावना

views

4:31
ध्वनी म्हणजे आवाज. आवाजालाच शास्त्रीय भाषेत ध्वनी असे म्हणतात. मग आता तुम्ही मला सांगा, तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कोणकोणते ध्वनी/आवाज ऐकतात. सकाळी पक्षांचा होणारा आवाज (किलबिलाट), आलार्म, वाहनांचा आवाज, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज, शाळेतील घंटेचा आवाज, टीव्ही वरील गाण्यांचा आवाज. ही दैनंदिन जीवनात अनुभवाला येणारी ध्वनीची उदाहरणे आहेत. असे बरेच ध्वनी कानावर पडत असतात. आपल्या कानावर पडणारे काही ध्वनी मोठे असल्याने सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी खूप लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. काही ध्वनी आपल्याला आवडतात तर काही ध्वनींचा आपल्याला त्रास होतो.