तारकांच्या दुनियेत

प्रस्तावना

views

5:03
आज आपण तारकांच्या दुनियेत या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपली सूर्यमाला ही विविध खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. या खगोलीय वस्तूंमध्ये विविध घटकांचा समावेश होतो. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. चंद्र, सूर्य, तारे, ग्रह आपण आकाशात पाहतो. ह्या सर्व खगोलीय वस्तू आहेत. आपण आकाशाचे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की या सर्व खगोलीय वस्तूंचे रंग, आकार, त्यांचा प्रकाश, लुकलुकणे व त्यांची जागा यामध्ये वेगळेपणा आहे. या निरभ्र आकाशाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काही चांदण्या मोठ्या, ठळक, तर काही लहान, अंधुक अशा दिसतात. चंद्र आणि सूर्य आपल्याला मोठे दिसतात कारण ते पृथ्वीच्या जवळ आहेत. चंद्र व सूर्य ह्या पृथ्वीच्या जवळच्या खगोलीय वस्तू आहेत, आपल्या आकाशामध्ये चंद्र व सूर्य आहेत याप्रमाणेच इतर अनेक तारे आहेत. या ताऱ्यांची आपआपली वेगळी ओळख आहे. तर आज या पाठामध्ये आपण ग्रह, तारे, नक्षत्रे यांविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या आकाशगंगेमध्ये विविध घटक आहेत. या घटकांचा समावेश दीर्घिकेमध्ये होतो.