आनुवंशिकता व उत्क्रांती

प्रस्तावना

views

4:32
आनुवंशिकतेविषयी या अगोदर आपण अभ्यास केला आहे. आपल्या सभोवतालचे जे प्राणी आपण पाहतो त्यांच्यामध्ये आनुवंशिकतेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला असतो. आनुवंशिक बदल कसे घडून येतात हे आपण या पाठात अधिक विस्ताराने अभ्यासणार आहोत. सजीवांच्या पेशी केंद्रातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा गुणसूत्र हा घटक आहे. ही गुणसूत्रे केंद्रकाम्ले व प्रथिने यांनी बनलेली असतात. बरं आता मला सांगा मात्यापित्यांची शारीरिक व मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला आनुवंशिकता म्हणतात? आईवडलांची शारीरिक व मानसिक लक्षणे हे त्यांच्या संततीमध्ये आनुवंशिकतेमुळेच येतात.म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखीच, कबुतराची पिल्ले कबुतरासारखीच होतात. मग मला सांगा डी.एन.ए चा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो? नाही माहीत? बरं मीच सांगते: डी.एन.ए चा रेणू डी ऑक्सिरायबोझ शर्करा, फॉस्फरिक आम्ल व नत्रयुक्त पदार्थाच्या जोड्यांपासून बनलेला असतो.