बैजिक राशींचे अवयव

a3 + b3 चे अवयव

views

5:34
आता आपण a3 + b3 चे अवयव कसे पाडतात ते पाहू. आपण a अधिक b कंसाच्या घनाचा विस्तार (a + b)3 अभ्यासला आहे. (a + b)3 = a3 + 3a2b + 3ab2 + b3 या विस्तार सुत्रातून आपण जर 3ab हा सामाईक अवयव घेतला तर या विस्तार सूत्राची मांडणी (a + b)3 = a3 + b3 + 3ab× (a+b) अशा प्रकारे होईल. आता या दोन्ही बाजूंच्या पदांची अदलाबदल करून घेवूया. म्हणजे उजवी बाजू डाव्या बाजूला व डावी बाजू उजव्या बाजूला जसे: a3 + b3 + 3ab×(a+b) = (a + b)3 a3 + b3 = (a + b)3 – 3ab× (a+b) (+3ab हे बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेस गेल्यावर -3abझाले.) a3 + b3 = (a + b)3– 3ab×(a+b) येथे (a + b)3 (a अधिक b कंसाचा घन दिला आहे म्हणजे a+b हे तीन वेळा आहेत. म्हणून (a + b)3 साठी आपण [(a+b) (a+b)2] हा विस्तार वापरू. म्हणून a3 + b3 = [(a+b) (a+b)2] – 3ab×(a+b) झाले. आता येथे (a+b)2 चे a2 + 2ab + b2 हे विस्तार सूत्र वापरू व बाकीचे आहे तसेच लिहू. a3 + b3 = (a+b) (a2 + 2ab+b2 – 3ab) ∴ a3 + b3 = (a+b) (a2 + 2ab+b2 – 3ab) येथे +2ab व -3ab यांची वजाबाकी करू ∴ a3 + b3 = (a+b) (a2 - ab+b2) आहे.