चलन

उदाहरणे

views

3:13
आता आपण समचलनातील चिन्हांकित मांडणीतील सर्व संकल्पना समजण्यासाठी काही उदाहरणे समजून घेऊया. उदा. 1) x हे y शी समचलनात आहे. जर x = 5 असताना, y = 30 असेल तर चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. सर्वप्रथम आपण दिलेले उदाहरण चिन्हात मांडू. x हे y शी समचलनात आहे. म्हणजेच x α y आहे. ∴ x = ky येथे k हा चलनाचा स्थिरांक आहे. (आता चलाच्या जागी योग्य ती किंमत लिहू.) उदाहरणात x = 5, तर y = 30 दिले आहे. म्हणून x = ky 5 = k x 30 ∴ k = 5/30 (5 ने 30 ला भाग दिला असता 1 छेद 6 हा चलनाचा स्थिरांक मिळतो.) ∴ k = 1/6 यावरून चलनाचे समीकरण x = ky म्हणजेच x = y/6 किंवा y = 6x हे समीकरण मिळते. (येथे k च्या ठिकाणी त्याची किंमत ठेवली आहे. )