चलन

काळ, काम, वेग

views

3:17
आता आपण काळ, काम, वेग याविषयी जाणून घेवूया. एखादे बांधकाम पूर्ण करण्यासाठी नेमलेल्या मजूरांची संख्या व त्यांना काम करण्यास लागलेला वेळ यांच्याशी संबंधित उदाहरणे व्यस्त चलनाची असतात. तसेच व्यस्त चलनाची काही उदाहरणे वाहनांचा वेग व त्यांना ठराविक अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ यांच्याशी संबंधित असतात. अशा उदाहरणांना काळ-काम-वेग यांच्याशी संबंधित उदाहरणे म्हणतात. उदा.1) एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या? उकल :- काम पूर्ण होण्यास लागणारे दिवस आणि काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या यात व्यस्त चलन असते. दिवसाची संख्या - d व स्त्रियांची संख्या -n मानू. यावरून हे आपण चिन्हरूपात लिहू d  1/n म्हणजेच d x n = k आता चलनाचा स्थिरांक काढून घेवू. जेव्हा (n) = 15 तेव्हा d = 8 आहे. व्यस्त चलनाचे सूत्र: d x n = k = 8 x 15 = k ∴ k = 120 चलनाचा स्थिरांक मिळाल्यानंतर आता दिवसाची संख्या(d) =6 आहे तेव्हा किती स्त्रिया(n) लागतील ते काढू. चलनाचे सूत्र = d x n = k (k हा स्थिरांक आहे). = 6 x n = 120 (समीकरणात किंमत लिहीली) ∴ n = 120/6 = 20 ∴ n = 20 6 दिवसात काम पूर्ण करायचे असल्यास 20 स्त्रिया लागतील.