चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार

चौकोनाच्या तीन बाजू आणि दोन कर्ण दिले असता चौकोन रचना करणे

views

5:11
मुलांनो चौकोनाच्या दहा घटकांपैकी विशिष्ट पाच घटकांची मापे माहित असतील तर त्या चौकोनाची रचना करता येते. या रचनांचा आधार त्रिकोण रचना हाच असतो. त्रिकोण रचना कशी करायची ते आपण पाहूया. उदाहरण: PQRS (चौकोन PQRS) असा काढा की; l(PQ) = 5.6 सेमी, l(QR) =5 सेमी, l(PS)= 4.3 सेमी, l(RS) =7 सेमी, l(QS) = 6.2 सेमी असेल. दिलेल्या माहितीवरून एक कच्ची आकृती काढा. आता पक्की आकृती काढण्यासाठी PQ हा 5.6 सेमी लांबीचा रेषाखंड काढा. नंतर कंपासमध्ये 4.3 सेमी लांबीचे अंतर घ्या. बिंदू P वर कंपासचे लोखंडी टोक ठेवून वरच्या बाजूस एक कंस करून घ्या. आता कंपासमध्ये 6.2 सेमी लांबीचे अंतर घेवून कंपासचे लोखंडी टोक Q बिंदूवर ठेवा. आणि पहिल्या कंसाला छेदणारा दूसरा कंस काढून घ्या. त्यांच्या छेदनबिंदूला S हे नाव द्या. बिंदू PS व बिंदू QS जोडून घ्या. आता कंपासमध्ये 5 सेमीचे अंतर घ्या. बिंदू Q वर लोखंडी टोक ठेवून वरच्या बाजूस एक कंस काढून घ्या. कंपासमध्ये 7 सेमीचे आंतर घेऊन बिंदू S वर कंपासचे लोखंडी टोक ठेवा. आता पहिल्या कंसाला छेदणारा दूसरा कंस काढा. त्यांच्या छेदनबिंदूला R हे नाव द्या. आता बिंदू SR व बिंदू QR जोडा. अशाप्रकारे ∆ SPQ व ∆ SRQ काढले असता दिलेल्या मापाचा चौकोन PQRS तयार झाला.