चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार

काटकोन चौकोन किंवा आयत

views

5:14
चौकोन या आकृतीच्या बाजू व कोनांवर वेगवेगळ्या अटी घातल्या की, चौकोनाचे वेगवेगळे प्रकार मिळतात. काटकोन चौकोन किंवा आयत आणि चौरस या चौकोनाची ओळख आपल्याला आहेच. चौकोनाच्या आणखी काही प्रकारांचा अभ्यास आपण करूया. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला ‘काटकोन चौकोन’ किंवा ‘आयत’ म्हणतात. चौकोन काढण्यासाठी दिलेल्या पाच घटकांमध्ये लगतच्या दोन बाजू असाव्या लागतात. लगतच्या दोन बाजू व तीन कोन माहित असतील तर आपण चौकोन रचना करू शकतो. आयत: PQRS हा आयत काढून त्याच्या दोन कर्णाच्या छेदन बिंदुला T हे नाव द्या.