बहुपदींचा भागाकार

एकपदीला एकपदीने भागणे

views

3:31
आता आपण एकपदीला एकपदीने कसे भागतात ते पाहू. उदा 1) 15P3 ÷ 3P हा भागाकार करूया. या उदाहरणात प्रथम 15P3 ला भाजक 3P ने भागले असता (3 x 5 x P x P x P)/(3 x P) = 5p2 भागाकार मिळतो. म्हणून 15P3 येण्यासाठी 3P ला 5P2 ने गूणले असता 15P3 उत्तर मिळाले. आणि भागाकार 5P2 व बाकी 0 मिळते. म्हणजेच भाज्य = भाजक × भागाकार + बाकी 15P3 = 3P × 5P2 + 0. म्हणून 15P3 येण्यासाठी 3P ला 5P2 ने गूणावे लागेल.