बहुपदींचा भागाकार

बहुपदीला द्विपदीने भागणे

views

4:24
मुलांनो आता आपण बहुपदीला द्विपदीने कसे भागतात ते समजून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण बहुपदीला एकपदीने भागतो, त्याचप्रमाणे ही क्रिया करायची आहे. चला तर मग आपण या उदाहरणांचा अभ्यास करूया. उदा.1) (x2+ 4 x + 4) ÷ (x+2) या उदाहरणात सर्वप्रथम दिलेली बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहावी. आता x2 उत्तर येण्यासाठी x+2 ला x ने गूणावे लागेल. म्हणून(x+2) x x = x2+ 2 x म्हणून भागाकारात x ने भाग लावूया व x2+ 4 x मधून x2+ 2 x वजा करूया. मोठया संख्येचे चिन्ह देवूया. आता 2 x+4 येण्यासाठी x+2 ला 2 ने गूणावे लागेल म्हणजे (x+2) x 2 = 2 x+ 4 म्हणून आपण 2 ने भाग लावूया. 2 x+ 4 मधून 2 x+ 4 वजा करू बाकी शून्य उरेल व भागाकार x+2 येईल.