चौकोन

प्रस्तावना

views

5:31
रेषा, कोन, रेषाखंड, किरण यांविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. मग मला सांगा कोन म्हणजे काय? दोन किरण परस्परांना छेदतात त्यांच्या छेदनबिंदुला कोन म्हणतात. एकरूप रेषाखंड म्हणजे काय? जर दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात. रेषाखांडाची लांबी, म्हणजे काय? रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला रेषाखंडाची लांबी म्हणतात. ज्या चौकोनाच्या संमुख बाजूंच्या दोन्ही जोडया समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. समांतर भूज चौकोनाचे गुणधर्म: i) समांतर भूज चौकोनाच्या संमुख बाजू एकरूप असतात. ii) त्याचे संमुख कोन एकरूप असतात. iii) कर्ण परस्परांना दुभागतात. iv) समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पुरककोन असतात म्हणजे लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज 180० असते. ही आकृती पहा यामध्ये बाजू AB ≅ बाजू DC, आणि बाजू AD ≅ बाजू BC आहे. मुलांनो, प्रमेय सिद्ध करताना किंवा उदाहरणे सोडवताना समांतरभूज चौकोनाची आकृती वारंवार काढावी लागते. म्हणून आपण आता ABCD हा समांतरभुज चौकोन कसा काढायचा ते पाहूया. रीत-I प्रथम AB व BC हे कोणत्याही लांबीचे, एकमेकांशी कोणत्याही मापाचा कोन करणारे रेषाखंड काढा. आता रेख AD आणि रेख BC समांतर असले पाहिजेत म्हणून बिंदू A मधून रेख BC ला समांतर रेषा काढा. तसेच रेख AB ∥रेख DC आहे. म्हणून बिंदू 'C' मधून रेख AB ला समांतर रेषा काढा. दोन्ही रेषा ज्या बिंदूत छेदतात त्याला D नाव द्या. पहा हा तयार झालेला चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ∵बाजू AB ∥बाजू DC व बाजू AD ∥बाजू BC आहे.