सांख्यिकी

उदाहरण 2

views

2:38
राजापूर या गावातील 30 शेतकऱ्यांचे सोयाबीनचे एकरी उत्पादन क्विंटलमध्ये पुढील प्रमाणे आहे: 9, 7.5, 8, 6, 5.5, 7.5, 5, 8, 5, 6.5, 5.5, 4, 4, 8, 6, 8, 7.5, 6, 9, 5.5, 7.5, 8.5, 6.5, 5, 9, 5.5, 4, 8. यावरून वारंवारता सारणी तयार करा. आणि सोयाबीनच्या एकरी उत्पादनाचा मध्य काढा. उकल : मुलांनो या उदाहरणातही बऱ्याच शेतकऱ्यांचे एकसारखे उत्पादन झाले आहे असे दिसून येते. या सर्वांची सलग बेरीज करणे क्लिष्ठ आहे. म्हणून आपण ही सर्व माहिती तक्त्यामध्ये आखूण त्यांचे वर्गीकरण करून घेवू, जेणे करून बेरीज सोपी होईल. पहिल्या स्तंभात एकरी उत्पादन (x_i) क्विंटलमध्ये चढत्या क्रमाने मांडून घेवू. उदाहरणात सर्व क्विंटलचे निरीक्षण केले तर असे दिसते की, 4 पेक्षा लहान अंक किंवा प्राप्तांक यामध्ये नाही. म्हणून मांडणी 4 पासून पुढे चढत्या क्रमाने करूया. दूसऱ्या स्तंभात तो प्राप्तांक किती वेळा आला आहे हे समजण्यासाठी ताळयाच्या खूणा मोजून वारंवारता लिहू व त्याची एकूण वारंवारता (N) खाली मांडू. चौथ्या स्तंभात f_i× x_iयांचा गूणाकार मांडू व सर्व प्राप्तकांची बेरीज खाली ∑▒〖f_i x_i 〗 ने दाखवू आणि नंतर मध्य (x ̅) (एक्सबार) काढू. सूत्र x ̅ (एक्सबार) =(∑▒〖f_i x_i 〗)/N (सिग्मा एफ आय × एक्स आय छेद वारंवारता) या सूत्रात किंमती लिहून मध्य काढू.