सांख्यिकी

विभाजित स्तंभालेख

views

2:50
आता आपण विभाजित स्तंभालेखाविषयी जाणून घेवूया. आलेखाच्या साहाय्याने आपण साधा स्तंभालेख व जोडस्तंभालेखाचा अभ्यास केला आहे. आलेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे, माहितीचे संकलन केले आहे. ज्याप्रमाणे आपण माहितीचे तूलनात्मक विश्लेषण जोडस्तंभालेखाद्वारे दाखवतो, त्याचप्रमाणे विभाजित स्तंभालेख काढता येतो. विभाजित स्तंभालेखामध्ये दोन किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दाखवली जाते. चला तर मग आपण विभाजित स्तंभालेख कशाप्रकारे काढतात ते पाहूया.