एकचल समीकरणे

सरावासाठी शाब्दिक उदाहरणे

views

2:46
1) जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किलोग्रॅम आहे. तर जोसेफचे वजन काढा. उकल: मुलांनो, येथे जोसेफच्या लहान भावाचे वजन x किलोग्रॅम मानू. जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनापेक्षा दुप्पट आहे म्हणून ते 2 x आहे. दिलेल्या माहितीवरून आता आपण समीकरण तयार करू. 2 x + x = 63(2 x जोसेफचे वजन आणि x लहान भावाचे वजन) 3 x = 63∴x= 63/3∴x = 21 ∴ लहान भावाचे वजन 21 किलोग्रॅम आहे. मग आता आपण जोसेफचे वजन काढू. जोसेफचे वजन= 2 × x= 2 × 21= 42 किलोग्रॅम ∴ जोसेफचे वजन 42 किलोग्रम आहे. 42 + 21 = 63 म्हणून हे समीकरण सत्य आहे.