एकचल समीकरणे

उदाहरण 3

views

2:50
रत्नाजवळची रक्कम रफिकजवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा 200 रुपयांनी जास्त आहे. रत्नाजवळचे 300रु घेवून रफिकला दिले. तर रत्नाजवळची रक्कम रफिक जवळच्या रक्कमेच्या 7/4 पट होते. तर रफिकजवळची मूळ रक्कम किती होती? मूळ रक्कम काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. उकल: रफिकजवळची रक्कम x मानू, रत्नाजवळील रक्कम रफिकजवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा 200 रूपयांनी जास्त आहे. म्हणून, x ची तिनपट = 3 x + 200 = रत्नाजवळची रक्कम. रत्नाजवळचे 300 रुपये घेऊन रफिकला दिले. म्हणून रत्नाजवळ 3 x – 100 रुपये उरले. म्हणून रफिकजवळ x + 300 रुपये झाले. रत्नाजवळची नवीन रक्कम ही रफिकजवळच्या रकमेच्या 7/4 पट झाली. म्हणून यावरून आपण समीकरण मांडू. (3 x – 100)/( x + 300)=7/4(तिरकस गुणाकार करू) =4 × (3 x – 100) = 7 × ( x+ 300) = 12 x – 400 = 7 x+2100 =12 x -7 x = 2100 + 400 ∴5 x = 2500 ∴x=2500/5∴x= 500 तर रफिकजवळ 500 रुपये होते.