क्षेत्रफळ

त्रिकोणाचे क्षेत्रफळ

views

3:39
आता आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र पाहू. x पाया x उंची हे सूत्र आपल्याला माहित आहे. त्रिकोणाची उंची दिली नाही. परंतू त्रिकोणाच्या तीनही बाजूची लांबी दिली आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते आता आपण पाहूया. ∆ ABC मध्ये बाजूंची लांबी अनुक्रमे a, b, c दिली आहे. यावरून आपण त्रिकोणाची अर्धपरिमिती काढू. अर्धपरिमिती काढण्यासाठी त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज करून त्याला 2 ने भाग दिला जातो. अर्धपरिमिती ‘S’ या अक्षराने दाखवतात म्हणून अर्धपरिमिती (S) = (a+b+c )/2 यावरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(S ×(S-a)(S-b)(S-c))या सूत्रालाच हिरोचे सूत्र असेही म्हणतात. या सूत्राचा वापर करून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढतात तेउदाहरणांतून समजून घेऊ.