पृष्ठफळ व घनफळ

सोडवलेली उदाहरणे

views

4:19
इष्टिकाचिती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी 1 मीटर, रुंदी 40 सेमी, उंची 50 सेमी आहे. तर त्या पेटीत किती पाणी मावेल ते सांगा. उकल: मुलांनो, लक्षात घ्या की, जेवढे त्या इष्टिकाचिती पेटीचे घनफळ असेल, तेवढेच पाणी त्यात मावणार आहे. उदाहरण जर नीट वाचले तर इष्टिकाचितीची लांबी मीटरमध्ये व रुंदी व उंची सेमी मध्ये दिली आहे हे लक्षात येते. सर्वप्रथम आपण मीटरचे सेमी मध्ये रुपांतर करून सर्व एकके सारखी करून घेवू. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. म्हणून आता लांबी 100 सेमी, रुंदी 40 सेमी, उंची 50 सेमी आहे. म्हणजेच सर्व एकके समान झाली आहेत. आता आपण इष्टिकाचितीच्या घनफळाचे सूत्र लिहू व त्यात किंमती घालू. पेटीचे घनफळ= l × b × h. (लांबी × रुंदी × उंची) = 100 × 40 × 50 = 2,00,000 घनसेमी, 2,00,000 घनसेमी = (200000 )/1000 = 200 ली. (∵ 1000 घनसेमी = 1 ली) ∴ पेटीमध्ये 200 लीटर पाणी मावेल.