वर्तुळ - जीवा व कंस

उदाहरणे

views

2:37
आता वरील गुणधर्मांच्या आधारावर आपण काही उदाहरणांचा सराव करूया. आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे. काही केंद्रीय कोनांची मापे दिली आहेत. त्यावरून ∠AOB ,∠COD यांची मापे काढा. कंस AB ≅कंसCD हे दाखवा. जीवा AB ≅जीवा CD दाखवा. उकल: या आकृतीत O हा वर्तुळकेंद्र आहे व रेख MN हा वर्तुळाचा व्यास आहे. m∠MOA + m∠AON=1800(कारण हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 1800 असते.) i) m∠MOA + (m∠AOB + m∠BON) = 1800 m∠AOB + m∠BON= m∠AON 1000+ m∠AOB + 350= 1800(कोनांची मापे लिहिली) 100 +35 + m∠AOB = 1800(100 व 35 यांची बेरीज केली) m∠AOB = 180 -135∴ m∠AOB=450 जर m∠AOB=450 असेल तर त्याचप्रमाणे m∠COD=450दाखविता येईल. कारण(m∠AOB≅m∠COD) आहे. ii) m(कंस AB) = m∠AOB =45oकेंद्रिय कोनाचे माप व त्याच्या संगत कंसाचे माप समान असते. m(कंसCD) = m∠COD =45o म्हणून m(कंस AB) = m(कंसCD) ∴ कंस AB ≅ कंस CD(समान मापाचे कोन एकरूप असतात.) iii) कंस AB ≅ कंस CD ∴ जीवा AB ≅ जीवा CD आहे. (कारण एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत जीवा एकरूप असतात) मुलांनो, अशा प्रकारे आज आपण वर्तुळ - जीवा व कंस या पाठाचा अभ्यास केला.