सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

प्रस्तावना

views

4:21
तुम्हांला हे माहीतच आहे की, सजीवांच्या जीवनप्रक्रिया व्यवस्थित सुरू राहण्यासाठी शरीरांतर्गत क्रिया व्यवस्थित पार पडायला हव्यात. शरीरातील जीवनप्रक्रियेवरच सजीवांचे आरोग्य अवलंबून असते. आणि या जीवनप्रक्रिया म्हणजेच श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन होय. यांतील श्वसन व रक्ताभिसरण या जीवनप्रक्रियांचा शरीरात ऊर्जानिर्मितीसाठी खूप उपयोग होतो. आपण मागील पाठात पेशीविभाजनाचा अभ्यास केला आहे. मग मला सांगा की पेशीविभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? त्या प्रकारांत काय फरक आहे? सूत्री विभाजन व अर्धसूत्री विभाजन हे पेशीविभाजनाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. सूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. त्यात एका जनक पेशीपासून दोन जन्यपेशी तयार होतात. तर अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. त्यात एका जनकपेशीपासून चार जन्यपेशी तयार होतात.