पर्यावरणीय व्यवस्थापन

प्रस्तावना

views

3:35
सजीवांच्या जीवनशैलीवर पर्यावरणाचा खूप मोठा परिणाम होत असतो. सजीवांचे अस्तित्व हे पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण परिसंस्था ह्या पर्यावरणावर अवलंबून असतात. या पाठात आपण पर्यावरणाच्या व्यवस्थापनाविषयीच्या माहितीचा अभ्यास करणार आहोत. एखाद्या परिसरातील जैविक, अजैविक घटकांमध्ये असणाऱ्या आंतरक्रियेमुळे परिसंस्था तयार होते. परिसंस्थेमध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, आर्द्रता, तापमान हे अजैविक तर जीवाणू, कवक, वनस्पती व प्राणी हे जैविक घटक असतात. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक असे भक्षकांचे प्रकार आहेत. हे प्रकार विविध पोषणपातळ्यांवर अवलंबून असतात. झाडावरील काही पक्षी हे अन्न म्हणून तलावातील जीवांवर अवलंबून असतात. तसेच पक्षी पिण्यासाठी तलावातील पाण्यांचा उपयोग करतात. अन्नसाखळीमध्ये उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक, अशा चार किंवा त्यापेक्षा जास्त कड्या ह्या सरळरेषेने जोडलेल्या असतात. तर अन्नजाळे हा गुंतागुंतीच्या आणि अनेक शाखा असलेल्या अन्नसाखळ्यांचा समूह असतो.