हरित ऊर्जेच्या दिशेने

प्रस्तावना

views

6:04
ऊर्जा ही आज मानवाची प्राथमिक गरज बनली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ऊर्जा आपल्याला नैसर्गिक स्त्रोतांतूनही मिळते. मात्र या नैसर्गिक स्त्रोतांचा आपण योग्यप्रकारे वापर केला तर याचे फायदे सर्वच सजीवांना होऊ शकतात. एखादया पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता हीच त्या पदार्थाची ऊर्जा आहे. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. MKS पद्धतीत ज्यूल तर CGS पद्धतीत अर्ग हे ऊर्जेचे एकक आहे. यांत्रिक ऊर्जेचे गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा हे प्रकार आहेत. स्थितिज व गतिज ऊर्जा हे ऊर्जेचे प्रमुख दोन प्रकार आहेत. उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणु ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा.ऊर्जेच्या या विविध रूपांमुळे माणूस त्याच्या ऊर्जेची गरज भागवतो. आता आपण ऊर्जा व ऊर्जेच्या वापराविषयी माहिती घेऊ.