त्रिकोणमिती

प्रस्तावना त्रिकोणमितीची ओळख

views

03:22
आपण त्रिकोणमितीचा अभ्यास करणार आहोत. त्रिकोणमिती म्हणजे काय? त्याची गुणोत्तरे कशी लिहायची, त्याचे गुणधर्म काय? चला तर मग सुरुवातीला आपण त्रिकोणमितीची ओळख करून घेऊया. आपण जमिनीवरील अंतरे दोरीने, चालत जाऊन मोजू शकतो. परंतु समुद्रातील जहाजाचे दीपस्तंभापासूनचे अंतर कसे मोजत असतील? झाडाची उंची कशी मोजायची? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी गणित विषयाच्या त्रिकोणमिती या शाखेचा उपयोग होतो. त्रिकोणमितीचा उपयोग अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, नौकाशास्त्र इत्यादी शाखांमध्येही केला जातो. त्रिकोणमिती (Trignometry) हा शब्द तीन ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. Tri म्हणजे तीन, gona म्हणजे बाजू, metron म्हणजे मोजमाप. काटकोन त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय आणि समरूप त्रिकोणांचे गुणधर्म यांच्या आधारे त्रिकोणमिती विषयाची सुरुवात होते. त्यांची उजळणी करू. एखाद्या मोठ्या झाडाची उंची मोजायची असेल तर समरूप त्रिकोणांच्या गुणधर्माचा उपयोग करून ती कशी काढता येते ते आपण एका कृतीच्या साहाय्याने समजून घेऊ. कृती: हा प्रयोग दिवसा चांगले ऊन असेल तेव्हा करता येतो. ही आकृती पहा. यामध्ये QR ही झाडाची उंची आहे. BC ही एका काठीची उंची आहे. लहान काठी जमिनीत उभी रोवून तिची उंची व तिच्या सावलीची लांबी मोजा. त्या झाडाच्या सावलीची लांबी मोजा. पाहा, सूर्याचे किरण समांतर असल्यामुळे ∆PQR व ∆ABC हे समकोन म्हणजेच समरूप त्रिकोण आहेत असे दिसून येते.