Importance of written communication

Importance of written communication

views

07:31
रिटन कम्युनिकेशन: लेखी स्वरुपातली माहितीची, संदेशाची देवाणघेवाण. मोबाईल किंवा ई मेल नव्हते, तेव्हा पत्राद्वारे एकमेकांची खुशाली कळवली किंवा विचारली जात असे. शुभेच्छा असो किंवा सुख- दुःखाची बातमी, सर्व पत्राद्वारेच कळवलं जात असे. पत्र हे लेखी संवादाचं उदाहरण आहे. कारण त्यावेळेस मोबाईल किंवा ई-मेल ही संवादाची माध्यमं उपलब्ध नव्हती. आता जेव्हा संवादाची वेगवेगळी माध्यमे विकसित झाली आहेत, तेव्हा लेखी संवादाचं स्वरूपदेखील बदललं आहे. त्याला वेग आला आहे. पत्र, मोबाईल संदेश, ई-मेल हे सर्व प्रकार लेखी संवादाची उदाहरणं आहेत. याने त्वरित संवाद साधता येतो. जाहिरात पत्रकं, जाहीर सूचना, ग्रीटिंग कार्डदेखील लेखी संवादाची उदाहरणं आहेत.