Structured of Teamwork

Structured of Teamwork

views

03:10
टीमवर्क म्हणजे काही व्यक्तींचा समूह एकाच दिशेने अणि ध्येयासाठी काम करणं. पण हे टीमवर्क करतानाही टीमला एक दिशा मिळणं खूप गरजेचं असतं. अन्यथा, टीम आपल्या उद्देशापासून भरकटू शकते. टीमने आपले काम चोख करावं यासाठी आधी टीमला त्यांचं काम समजावून सांगणं फार महत्त्वाचं असतं. एका ध्येयासाठी एक टीम काम करू शकते किंवा एकाच ध्येयासाठी वेगवेगळ्या टीम नेमल्या जाऊ शकतात. टीम कामाला सुरुवात करण्याआधी टीमला कोणत्या पद्धतीने काम करायचं आहे हे समजावलं जातं. तसंच टीमने कोणत्या स्वरूपात काम करायचं आहे हे देखील माहित असावं. तरच जबाबदा-या व्यवस्थित विभागल्या जातात अणि ध्येय गाठणं सहज शक्य होते. कालांतराने त्यात बदल होऊ शकतात. कोणत्याही टीमचे स्वरूप हे टीम तयार करण्यापासून होते. साधारणतः संकल्पना- टीम नेमणं- विभाग नेमणं- पूर्वतयारी- प्रक्रिया- उत्पादन किंवा परिणाम- भाग- अहवाल.