महासागरांचे महत्त्व

जलावरणाचे घटक, जलावरणातील सजीवसृष्टी

views

3:08
अन्न, हवा, पाणी या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. आपल्याला पाणी कोठे आढ़ळते? आपल्याला पाणी नाले, ओढ़े, तलाव, नद्या, समुद्र या ठिकाणी आढ़ळते. समुद्रापेक्षाही मोठ्या जलाशयाला महासागर म्हणतात. महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे . पृथ्वीवर जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच तिला जलग्रही असे म्हणतात. आपण नेहमीच आपल्या परिसरातील सजीवसृष्टी पाहतो. त्यामध्ये विविधता आहे. जमिनीवरील सजीवसृष्टीपेक्षा कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात आहे त्यामध्येही विविधता आहे. या सजीवसृष्टीबरोबर जलावरणात म्हणजेच महासागरात इतर विविध घटकही आढ़ळतात. उदा. खनिजे, मँगनीजचे साठे