सजीवांतील पोषण

प्रस्तावना

views

4:10
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तिला कुपोषण म्हणतात. कुपोषण झालेल्या व्यक्तीला कुपोषित असे म्हणतात. कुपोषण म्हणजे आजार नाही, परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्त्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मूल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसू लागते. उदा. अंगावर सूज येणे, मूल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात न वाढणे, यालाच कुपोषण म्हणतात. असे कुपोषण होऊ नये म्हणून योग्य संतुलित आहार घेतला पाहिजे, आपल्या वयानुसार आहाराचे व्यवस्थित नियोजन केले पाहिजे.