सममिती

सममित अक्ष

views

2:41
सममित अक्ष ओळखता येणे. सर – मुलांनो, हे पहा समोरच्या आरशात आपले प्रतिबिंब दिसते आहे. त्याचे नीट निरीक्षण करा. त्यात काय काय दिसते ते मला सांगा! वि- मी डावा हात वर केला तर आरशातील माझ्या प्रतिबिंबाचा उजवा हात वर दिसतो. वि – मी आरशापासून जेवढया अंतरावर उभा आहे, तेवढ्याच अंतरावर आरशाच्या आत माझे प्रतिबिंब दिसते आहे. जर मी आरशापासून थोडा लांब गेलो तर माझे प्रतिबिंब सुद्धा आरशापासून लांब जाते. जवळ आलो तर तेही जवळ येते. सर - बरोबर! आता मला सांगा प्रतिबिंबाच्या आकारात काही फरक जाणवतो का? वि - नाही शि: याचाच अर्थ असा होतो की आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित असते. वि: सर, सममित म्हणजे काय? सर – चला, आपण एका कृतीतून सममित आकृती समजून घेऊ. या साठी एक कागद घ्या. कागदाचे दोन समान भाग होतील अशी घडी घाला आणि नंतर ती घडी उलगडा. त्याच्या एका भागावर रंगाचा ठिपका काढा. आता हा कागद दुमडा. त्यावर थोडा दाब द्या. नंतर कागद उलगडा. सांगा काय दिसते आहे ? वि - घडीच्या दुसऱ्या बाजूलाही तसाच ठिपका उमटला आहे. सर – बरोबर. म्हणजेच तयार झालेली आकृती, घडीच्या रेषेशी सममित आहे. वि: सर , आम्ही सुद्धा सममित चित्र काढू शकतो का? बाई- हो , का नाही ! आत्ता आपण एक वेगळ्या प्रकारचे सममित चित्र काढू , त्यासाठी एक कागद घ्या. एक दोरा घेऊन तो रंगात बुडवा. कागदाच्या एका भागावर तो ठेवा. आता कागदाला घडी घाला. घडीवर दाब देऊन हळूच दोऱ्याचे एक टोक ओढा. आता कागद उलगडा. पहा काय दिसते आहे ? वि:- कागदाच्या घडीच्या दुसऱ्या बाजूला जो आकार दिसतो तो पहिल्या आकारासारखाच आहे. सर – बरोबर , म्हणजेच तयार झालेले चित्र सममित आहे असे म्हणता येईल. सर : तुम्ही सर्वांनी कधीतरी रुग्णवाहिका म्हणजेच अॅम्बुलन्स पहिलीच असेल. त्यावर लिहिलेल्या अक्षरांचे जर तुम्ही निरीक्षण केलंत तर तुम्हाला दिसेल की त्यावरील अक्षरे उलटी लिहिलेली असतात.तसेच एखाद्या कागदावर काही लिहिले आणि तो कागद जर आरशासमोर धरला तर आरशामध्ये दिसणारे त्या अक्षरांचे प्रतिबिंब उलटे दिसते. हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरी देखील करून पहा