प्राण्यांचा जीवनक्रम

फुलपाखरांमधील रूपांतरण भाग 2

views

02:22
सुरवंट दर दोन अडीच दिवसांनी कात टाकतो. पुन्हा तो वेगाने पाने कुरतडून खायला सुरुवात करतो. परत त्याची आणखी झपाटयाने वाढ होते. आणि परत दोन ते अडीच दिवसांनी तो पुन्हा कात टाकतो. अशा रीतीने तो दर दोन ते अडीच दिवसांनी चार वेळा कात टाकतो. अळीतून बाहेर पडल्यानंतर सुरवंट अवस्थेत बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू दहा ते बारा दिवस असते. पाचव्या वेळी वाढ पूर्ण झाली की, सुरवंट आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचा धागा काढतो. स्वत:भोवती तो धागा लपेटून घेत घेत त्याचे छोटेसे आवरण तो तयार करतो. त्या आवरणाला कोश म्हणतात. फुलपाखराच्या या वाढीच्या अवस्थेला कोशावस्था असे म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा-बारा दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही. पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात. कोशात बिबळ्या कडव्याची पूर्ण वाढ होते. नंतर पूर्ण वाढ झालेले प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते.