सजीवांचे परस्परांशी नाते

मानवाला वनस्पतींची गरज

views

03:57
मानवाला जशी प्राण्यांची गरज असते, तशी वनस्पतींचीसुद्धा गरज असते. वनस्पती मानवाला फळे, भाजीपाला, अन्नधान्य या गोष्टी देतात. तसेच त्याला आवडणारी फुले वनस्पतींकडूनच मिळतात. माणूस फुलांचा वापर विविध कारणांसाठी करतो. उदा. देवाला हार बनविण्यासाठी, देवपूजेसाठी, मंगल कार्यात, केसात घालण्यासाठी अशा विविध कारणांसाठी आपण फुले वापरतो. तसेच आपण जी सुती वस्त्रे वापरतो, ती बनविण्यासाठी कापसाची गरज असते. तो कापूसही आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतो. अशा प्रकारे विविध कारणांसाठी वनस्पती आपल्याला उपयोगी पडत असतात. आपणही आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या वनस्पतींची पद्धतशीर लागवड करतो. उदा. ऊस, कापूस, गहू, ज्वारी, झेंडू, मका यांसारखी कितीतरी पिके आपण घेतो. त्यांच्या बिया शेतात पेरतो. त्यांना त्यांच्या गरजेनुसार व्यवस्थित पाणी मिळेल याची काळजी घेतो. त्यांच्या वाढीसाठी व योग्य पोषण होण्यासाठी जरूरीप्रमाणे खते देतो. त्या वनस्पतींना कीड लागू नये म्हणून कीटकनाशके फवारतो. अशा तऱ्हेने आपण वनस्पतींची काळजी घेतो. वनस्पतीदेखील आपल्याला भरभरून देतात. आपल्या गरजा पूर्ण करतात. अशा तऱ्हेने मानव, प्राणी व वनस्पती यांच्या मदतीने आपल्या गरजा पूर्ण करतो.