घरोघरी पाणी

पिण्याच्या पाण्याची काळजी

views

2:52
पिण्याचे पाणी हे निर्धेाक असणे गरजेचे असते. आपण जर दूषित पाणी पिण्यासाठी वापरले तर रोग होऊ शकतात. म्हणून पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण विशेष काळजी घेतो. पिण्याच्या व स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकून ठेवतो. त्यामुळे पाण्यात धूळ, कचरा किंवा इतर घाण पडत नाही. पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात आपण हात बुडवून पाणी काढले, तर हातांना लागलेली घाण, हातावरील जंतू पाण्यात जातात. त्यामुळे ते पाणी झाकलेले असले तरी दूषित होते. असे पाणी प्यायल्याने आपल्याला रोग होऊ शकतात. म्हणून आपण पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचे ओगराळे वापरतो व पाणी काढून झाले की लगेच भांड्यावर झाकण ठेवतो. म्हणजे त्यात धूळ, कचरा पडून पाणी खराब होणार नाही. पण हे सर्व करण्यापेक्षा या भांड्यांना तोटया लावणे ही पाणी काढण्याची उत्तम पद्धत आहे. त्यामुळे पाणी खराब होण्याचा प्रश्नच उरत नाही. आणि पाणी काढणेही अधिक सोईचे होते. पिण्याचे पाणी साठविण्याच्या एखादया भांड्यातील पाणी संपले, की त्यात पुन्हा पाणी भरण्याआधी ते भांडे आपण स्वच्छ धुवून घेतो. आपण अशी काळजी घेतली तर पिण्याचे पाणी स्वच्छ राहते.