घरोघरी पाणी

माहीत आहे का तुम्हांला

views

4:04
आपण म्हणतो की “पाणी म्हणजे जीवन” हे अगदी बरोबर आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. मानवाला प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याची गरज असते. म्हणून पाण्याचा स्त्रोत मानवी वस्तीच्या शक्य तितक्या जवळ असणे गरजेचे असते. त्यामुळे आदिमानवाने ज्यावेळी भटकंती सोडून स्थिर जीवन जगण्यास सुरुवात केली, त्यावेळी त्याने आपल्या वस्त्या पाणी जवळ असणाऱ्या ठिकाणी वसविल्या. प्राचीन काळी नगरे वसली ती कुठल्या ना कुठल्या नदीच्या काठांवरच आपल्या देशात अशी अनेक शहरे आहेत:उत्तर भारतातील यमुना नदीवरील दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे. बिहारमध्ये गंगा नदीच्या काठी असलेले पाटणा, महाराष्ट्रातील गोदावरी नदी वरील नाशिक, पंचगंगा नदीवरील कोल्हापूर व चंद्रभागा नदीवरील पंढरपूर ही अशा प्राचीन नगरांची उदाहरणे आहेत. शहरी भागात उंचावरील टाक्यांमधून वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु आजही काही ग्रामीण भागांतील वस्त्यांमध्ये विहिरींमधून किंवा कूपनलिकांतून पाणी काढतात. आपण असे पाणी स्वच्छ मानतो. पण मुलांनो अशा पाण्यात जमिनीतील काही घटक मिसळतात. त्यामुळे असे पाणी निर्धेाक असेल असे नाही. त्यासाठी ते पाणी निर्धेाक असल्याची खात्री करून घ्यावी लागते. विहीरीचे पाणी निर्धेाक नसेल, तर पिण्यासाठी पाणी उकळून घ्यावे. असे पाणी प्यायल्याने आरोग्याला धोका राहाणार नाही. काही ठिकाणी जेथे पाणी उपलब्ध नसते, किंवा दुष्काळी भागात टँकरमधून वाहतूक करून वस्त्यांना पाणी पुरवतात असे पाणीही पिण्यासाठी वापरताना निर्धेाक करून घेणे आवश्यक असते.