आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला

प्रस्तावना तारे,ग्रह

views

4:02
रात्री आपण आकाशाकडे पाहिले, तर आपल्याला चंद्र आणि अनेक चांदण्या दिसतात. पण या चांदण्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. आकाशातील काही चांदण्या लुक-लुकताना दिसतात तर काही चांदण्या लुकलुकत नाहीत. आकाशातील या सर्व वस्तूंना आपण ‘खगोलीय’ वस्तू असे म्हणतो. चंद्र, सूर्य हे पृथ्वीच्या जवळ आहेत. म्हणून चंद्र आणि सूर्य गोलाकार आहेत हे आपल्याला सहज दिसू शकते. त्या व्यतिरिक्त इतर तारे, ग्रह हेही आपण पाहतो. चंद्र, सूर्य, तारे, ग्रह या सर्व खगोलीय वस्तू आहेत तुम्ही जर रात्री आकाशातील चंद्राचे आणि चांदण्यांचे निरीक्षण केलेत, तर तुम्हाला त्यांच्या रंगात, आकारांत, त्यांच्या प्रखरतेत आणि त्यांच्या स्थानांत होणारा बदल सहज पाहता येईल. म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र शुभ्र पांढऱ्या रंगासारखा दिसेल, पण त्यात थोडेसे काळसर डागही दिसतील. चांदण्या शुभ्र पांढऱ्या रंगांच्या दिसतील. ज्या चांदण्या लुकलुकताना दिसतात त्यांना तारे असे म्हणतात. ताऱ्यांचा प्रकाश कमी-जास्त होत असतो. आणि ते स्वयंप्रकाशित असतात. स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतःचा प्रकाश किंवा उजेड असणारे. रात्रीच्या वेळी बहुदा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा रंग लालसर, तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो. ग्रहांचे सूर्यमालेतील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ग्रहांना तारे प्रकाश देतात. प्रत्येक ग्रह हा स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे ग्रहाच्या एका प्रदक्षिणेत त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते.