पृथ्वीचे फिरणे

प्रस्तावना परिवलन, पृथ्वीचे परिवलन: करून पहा:

views

5:07
आपण ज्या ग्रहावर राहतो त्याचे नाव पृथ्वी आहे. पृथ्वी स्वत:भोवती फिरते. स्वत:भोवती फिरत-फिरत ती सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या अशा फिरण्यामुळे सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुमान, दिवस-रात्र, पौर्णिमा – अमावस्या यांसारख्या विविध क्रिया कशा पद्धतीने घडून येतात, त्याची सविस्तर माहिती आपण या पाठात घेणार आहोत. प्रथम आपण परिवलन म्हणजे काय? हे जाणून घेऊ.परिवलन : परिवलन समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करू. त्यासाठी एक भोवरा घ्या. हा भोवरा फिरवा. मुलांनो, याचे निरीक्षण करा आणि सांगा काय दिसते आहे?भोवरा स्वत: भोवती फिरतो आहे. तो फिरत असताना आपल्याला त्याच्याभोवती एक वर्तुळाकार रेषा असल्यासारखी दिसते आहे. स्वत:भोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. वस्तूच्या स्वत:भोवती फिरण्याला ‘परिवलन’ असे म्हणतात. तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते, तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा ‘अक्ष’ किंवा ‘आस’ असे म्हणतात. हा पृथ्वीचा गोल आहे. आता हा गोल फिरवून पहा. तो फिरवला असता, एका रेषेभोवती तो परिवलन करताना दिसत आहे. आता एक ओळंबा घ्या. तो पृथ्वी गोलाजवळ धरा. पहा, ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष म्हणजे परिवलनामुळे तयार झालेली अदृश्य रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या आता लक्षात आले असेल. म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. अशा कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी स्वत:भोवती फिरत असते. या प्रयोगात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे. NS ही रेषा पृथ्वीच्या मध्य बिंदुतून जाते. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव असे म्हणतात. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे. N म्हणजे North. आणि S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. S म्हणजे South होय. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्य भागावर म्हणजेच पृथ्वीच्या मध्यावरील पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पृथ्वीच्या मध्यातून गेलेल्या ह्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात. विषुववृत्तापासून उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध तर विषुववृत्तापासून दक्षिणेकडील भागाला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.