मोलाचे अन्न

भाकरीची गोष्ट भाग १

views

3:00
भाकरी आपल्यापर्यंत कशी पोहोचते, ते अर्जुनच्या आईच्या तोंडून ऐकू या. माझे बाबा शेतकरी आहेत. उन्हाळयात शाळेला सुट्टी असतेच. मी लहान होते तेव्हा आम्ही बाबांबरोबर ट्रॅक्टरवर बसून शेतात जायचो. तेव्हा शेतीच्या मशागतीची कामे सुरु असायची. ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडून बाबा शेतीची कामे करत. मशागतीसाठी प्रथम शेत नांगरत, मातीची ढेकळे फोडत, जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करत. अशा तऱ्हेने माझे बाबा शेतीची कामे करत. साधारणपणे चार महिने उन्हाळयात शेतीत कोणतेही पिक घेतले जात नसे. जमीन तापू दिली जात असे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास म्हणजेच जमिनी जास्त पिकावू होण्यास मदत होत असे. वर्षाची आई म्हणते. मृगाचा पाऊस पडला, की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वाफसा होतो. म्हणजेच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पावसाच्या पाण्यामुळे माती मऊ व्हायची. तेव्हा बाबा शेतात बाजरीची पेरणी करायचे. काही दिवसांनी बाजरीची रोपे मातीतून वर येत. बाजरीच्या जोडीने शेतात तणही वाढते. पिकाला आवश्यक असणारे घटक हे तणच शोषून घेतात. त्यामुळे पीक व्यवस्थित वाढू शकत नाही. हे तण काढणे आवश्यक असते. त्यासाठी बाबा मजूर लावत. त्या मजुरांना त्या बदल्यात पैसे दयावे लागत. पावसाच्या पाण्यावर बाजरीची ताटे आणखी जोमाने वाढतात. हळूहळू बाजरीच्या ताटांना कणसे लागतात व त्यात दाणे भरू लागतात. दाणे भरू लागले की पाखरांच्या झुंडी ते कोवळे बाजरीचे दाणे खाण्यासाठी त्या शेतात येतात. हे पक्षी बाजरीच्या ताटावर बसून दाणे खाऊ नयेत म्हणून गोफण फिरवून पाखरांना शेतातून पळवून लावावे लागे. काही ठिकाणी बुजगावणे उभे केले जात असे. बाजरीचे दाणे पूर्ण भरल्यानंतर त्याची कापणी करावी लागते. कापणी म्हणजे शेतात आलेली सगळी कणसे कापून एकत्र गोळा करायची. त्यानंतर मळणी आणि उफणणी करतात. या सर्व प्रक्रिया केल्यानंतर बाजरीचे दाणे मिळतात.