मोलाचे अन्न

भाकरीची गोष्ट भाग २

views

3:00
अर्धे घमेले भरून भुईमुगाच्या वाळलेल्या शेंगा घ्या. त्याचे दोन समान भाग करा. त्यातील एका भागाच्या शेंगा हाताने सोलून दाणे काढा. हाताने शेंगा सोलताना किती वेळ लागला ते पहा. नंतर दुसऱ्या भागातील शेंगा एका कापडी पिशवीत बांधून घ्या. त्यावरून वरवंटा फिरवा किंवा काठीने धोपटा. नंतर पिशवीतील शेंगा सुपात ओतून घ्या.सुपात ओतलेल्या पिशवीतील शेंगा फुटलेल्या आहेत. बऱ्याचशा शेंगातून दाणे बाहेर आले आहेत.ही एक प्रकारे शेंगांची मळणीच झाली. परंतु, ते पूर्णपणे स्वच्छ असे आपल्याला मिळाले नाहीत. त्यात अजून शेंगांची टरफले आहेत. ती घालवण्यासाठी आता या शेंगा पाखडा टरफले हलकी असतात म्हणून पाखडताना ती वाऱ्यामुळे दुसरीकडे पडतात. शेंगदाणे जड असतात. ते सुपातच राहतात. उफणणी करतानाही वाऱ्याचा उपयोग करून दाणे आणि टरफले वेगळी करता येतात. यालाच ग्रामीण भागात धान्य वाढविणे असेही म्हणतात. यंत्रामध्ये मळणी आणि उफणणी एकाचवेळी होते. कापणी केलेली कणसे यंत्रात घालतात. त्या कणसाचे दाणे मोकळे होऊन यंत्राला बांधलेल्या पिशवीत ते गोळा होत राहतात. कणसातील टरफले आणि इतर कचरा लांब जाऊन पडतो. आणि ही मळणी लवकर होते.