मोलाचे अन्न

भाकरीची गोष्ट भाग ३

views

3:42
पूर्वी यंत्रे नव्हती. त्यावेळी मळणी करण्यासाठी बैलांचा उपयोग करत. आजही काही दुर्गम भागात जिथे यंत्रे नेणे शक्य नसते. अशा ठिकाणी बैलांचा उपयोग केला जातो. त्यासाठी शेतात एक गोल जागा तयार करतात. त्याला खळे म्हणतात. त्या खळ्याच्या मधोमध एक खुंटा जमिनीत उभा करतात. त्याला बैल बांधतात. बैल त्या खुंटयाभोवती गोल गोल फिरतो. त्याच्या पायाखाली येतील अशा रीतीने कणसे रचून ठेवतात. बैल कणसावर फिरायला लागला, की त्याच्या वजनामुळे कणसाचे दाणे वेगळे होतात. पिक जास्त असले तर मोठे खळे तयार करतात. एका वेळी एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त बैल लावून मळणी केली जाते. मळणीचे काम अनेक दिवस चालते. हे काम बैलांसाठीही कष्टाचेच असते. कारण त्यांना दिवसभर त्या खुंटयाभोवती मळणी संपेपर्यंत फिरावे लागते. पूर्वीच्या मळणीची माहिती घेतल्यानंतर आता आपण परत अर्जुनच्या आईच्या भाकरीच्या गोष्टीकडे वळू. अर्जुनची आई पुढे सांगते, मळणीनंतर उफणणी केल्यानंतर मिळालेले जे स्वच्छ धान्य असते. ते पोत्यात भरून ठेवतात. त्या धान्याला कीड लागू नये, त्याची उंदीर, घुशींनी नासाडी करू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते. ते धान्य उन्हात घालून व्यवस्थित वाळविले जाते. म्हणजे त्यात किडे होणार नाहीत. तसेच त्यात कडूलिंबाचा पालाही टाकला जातो. त्या धान्याला घुशी, उंदीर लागू नये म्हणून त्यांची योग्य ठिकाणी साठवणूक केली जाते. घरातील आवश्यक तेवढे धान्य ठेवतात. आणि उरलेली पोती गाडीत भरून बाजारपेठेत विक्रीसाठी नेली जातात. तेथे व्यापारी हे धान्य शेतकऱ्याकडून विकत घेतात. त्यावेळी शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्याचे त्याला पैसे मिळतात.