वस्त्र

करून पाहा,

views

4:20
आता आपण एक प्रयोग करणार आहोत, एका छोट्या बादलीत स्वच्छ पाणी घ्या. दिवसभर वापरलेले कपडे त्यात भिजत घाला. तासाभराने बादलीतील कपडे बाहेर काढा. कपडे बादलीतून बाहेर काढतेवेळी ते बदलीतच घट्ट पिळून घ्या. कपडे काढल्यानंतर बादलीतील पाण्याचे निरीक्षण करा. बादलीतील पाणी स्वच्छ राहिले की त्यामध्ये काही बदल झाला आहे, बादलीतील पाणी गढूळ दिसते. ते पहिल्यासारखे पारदर्शक व स्वछ दिसत नाही, म्हणजेच कपड्यांतील अस्वच्छता, घाण पाण्यात मिसळली आहे. जेव्हा आपण कपडे वापरतो तेव्हा ते अस्वच्छ होतात. त्यावर वातावरणातील, धूळ, घाण साचते.