पाहू तरी शरीराच्या आत

ग्रासनलिका

views

3:37
तोंड आणि जठर ही आंतरेंद्रिये आहेत. ही इंद्रिये अन्नाच्या पचनाचे काम करतात. यांपैकी जठर हे पोटाच्या भागात म्हणजे उदरपोकळीत असते. तोंडातील घास जठरापर्यंत पोहचण्यासाठी वक्षपोकळीत एक नळी असते. तिला ग्रासनलिका किंवा ग्रासिका म्हणतात. ही ग्रासनलिका आपण चावलेले अन्न तोंडापासून जठरापर्यंत पोहचविण्याचे काम करते. आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. पदार्थ गोड, तिखट की आंबट हे आपल्याला जिभेमुळे कळते. दातांनी आपण अन्न चावतो. चावता चावता आपल्या तोंडातील लाळ त्यात मिसळते. त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा झाल्याने तो सहजपणे गिळता येतो. गिळलेला घास ग्रासनलिकेत जातो. ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते. लवचीक रबरी नळी दाबली की दबते, सोडली की पूर्वीसारखी होते ना, तशीच. त्यामुळे अन्नाचा घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो. म्हणजेच जठर हे तोंडापासून लांब असले तरी तोंडातील घास ग्रासनलिकाच्या माध्यमातून जठरापर्यंत पोहोचत असतो. मुलांनो, आपण पाहिले आहे की अन्नाचा घास आपण तोंडात घेतो. तो घास दाताने चावतो. त्यावेळी त्यात आपल्या तोंडातील लाळ मिसळते व तो घास मऊ होतो. हा मऊ घास छातीच्या भागातून पोटाच्या पोकळीपर्यंत पोहचला पाहिजे. यासाठी ग्रासिका वक्षपोकळीमधून उदरपोकळीपर्यंत अन्नाचे वहन करते. म्हणून पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये जरी उदरपोकळीत असली तरी ग्रासनलिका मात्र वक्षपोकळीतून खालच्या बाजूस उतरत असते. घशातून खाली आलेला घास पुढपर्यंत जठरात वाहून नेण्यासाठी ग्रासनलिकेच्या लवचीक भिंतींचा उपयोग होतो.