सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

सार्वजनिक सुविधा

views

4:08
मानव हा ‘समाजशील’ प्राणी आहे असे म्हटले जाते. आपण समूहाने राहातो, कारण आपण एकमेकांवर अवलंबून असतो. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक सेवासुविधांची आवश्यकता असते. यातील काही सेवासुविधा ह्या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. ‘सार्वजनिक’ म्हणजे सर्वजणांसाठी हे तर आपल्याला माहीतच आहे. पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, टपालसेवा, बँका या अशा सार्वजनिक सुविधा आहेत. घरात आपण पाणी, वीज, या सुविधांचा वापर करतो.पाण्याची इतकी गरज आपल्याला असते की ही सुविधा अत्यावश्यक सुविधा मानली जाते. पाण्याशिवाय सजीव प्राणी जीवन जगूच शकणार नाहीत. तसेच वीज ही सुविधादेखील खूपच महत्त्वाची आहे. वर्तमानपत्रे, टेलीव्हिजन यांचा सुद्धा आपण आपल्या घरामध्ये वापर करत असतो. आरोग्यसेवा, शिक्षण, वाहतूक, टपालसेवा, बँका, इत्यादी घराबाहेर मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा आहेत. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण आणि वाहतूक या काही महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत. या सेवा आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विशिष्ट व्यवस्था असते. सार्वजनिक सेवा व त्या सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या संस्था आणि त्या सुविधांचा लाभ घेणारे आपण हे सर्व मिळून ‘सार्वजनिक व्यवस्था’ निर्माण होते. आपली शाळासुद्धा या व्यवस्थेचा एक भाग आहे.