आपले घर व पर्यावरण

प्रस्तावना

views

3:35
राहण्यासाठी आपल्याला घर आवश्यक असते. घरे वेगवेगळ्या प्रकारची असतात, ही गोष्ट तुम्हाला माहितच आहे. घरे बनविण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरले जाते? घरे बनविण्यासाठी लोखंड, विटा, सिमेंट, रेती, लाकूड, पाणी, इत्यादी साहित्य वापरले जाते. मातीची घरे कच्ची असतात. त्यावर जास्त माळे चढविता येत नाहीत. पण सिमेंटची घरे ही पक्की असतात. त्यावर अनेक माळे चढविता येतात. घरामुळे आपल्याला थंडीपासून, पावसापासून, उन्हापासून संरक्षण तर मिळतेच, परंतु जंगली प्राण्यांपासून तसेच चोरांपासूनही संरक्षण मिळते. घराचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे निवाऱ्यासाठी आणि विश्रांतीसाठी होतो. दिवसभर आपण काम करतो, शाळेत जातो. दमून भागून घरी आलो की आपल्या विश्रांतीसाठी योग्य जागा ही ‘घरच’ असते. तसेच थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून आपले संरक्षणही घरामुळेच होते. शिवाय जंगली जनावरांपासून संरक्षणही घरामुळेच होते. समाजकंटक म्हणजेच वाईट प्रवृतीचे लोक, चोर यांपासून आपले संरक्षणही घरांमुळेच होते. घरात आपली सर्व चीज वस्तू व्यवस्थित ठेवता येते. यावरून आपल्या लक्षात येते की ‘घर’ हे सर्वांसाठी किती महत्त्वाचे आहे.