केंद्रीय कार्यकारी मंडळ

प्रस्तावना, संघशासनाची रचना

views

2:36
आज आपण या पाठात केंद्रीय कार्यकारी मंडळाचा अभ्यास करणार आहोत. कायदेमंडळाचे कार्य हे कायदयाची निर्मिती करणे हे आहे. तर कार्यकारी मंडळाचे कार्य काय आहे व ते कशा पद्धतीने कार्य करते याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. संघशासन म्हणजे केंद्रशासन. शासनसंस्थेच्या तीन शाखा आहेत: 1)कायदेमंडळ 2)कार्यकारी मंडळ 3)न्यायमंडळ. या तीन शाखा जनतेचे हित किंवा कल्याण करण्यासाठी काम करीत असतात. संसदीय शासनपद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाचा भाग असते आणि ते कायदे मंडळाला जबाबदार असते. कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश असतो, त्याची माहिती आपण आता घेणार आहोत. तसेच आपल्या राज्यघटनेत त्याबाबत कोणत्या तरतुदी आहेत, तसेच कार्यकारी मंडळ लोकांचे हित साधण्यासाठी धोरणांची आखणी कशी करते इ. बाबी आपल्याला या पाठातून माहीत करून घायच्या आहेत. भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. भारतीय केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद राज्यघटनेच्या कलम ५२ ते ७८ मध्ये केलेली आहे.