समांतर रेषा व छेदिका

समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म

views

4:49
समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म : मुलांनो, आता आपण समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक कृती करूया. एका वहीच्या कागदावर दोन समांतर रेषा व त्यांची एक छेदिका काढा. संगत कोनांचा गुणधर्म :- मुलांनो, समांतर रेषांच्या छेदिकेमूळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात. व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म :- समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी एकरूप असतात. आंतरकोनाचा गुणधर्म :- समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180० असते.