दिशा व नकाशा

माहीत आहे का तुम्हांला

views

5:36
दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात. म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशांनुसार जमिनीवर ठेवावा. त्यानंतर त्याचे वाचन केले तर वाचन दिशांनुसार अचूक होते.तुम्हांला दिसत असलेला नकाशा व दिशाचक्र यांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. मुलांनो, हा नकाशा महाराष्ट्र राज्याचा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांच्या सीमा दाखविल्या आहेत. त्यांची आपण माहिती करून घेऊ.बीड जिल्ह्याच्या उत्तरेला-जालना, ईशान्येला-परभणी, पूर्वेला-परभणी, आग्नेयेला-लातूर, दक्षिणेला-उस्मानाबाद, पश्चिमेला-अहमदनगर, वायव्येला-औरंगाबाद असे जिल्हे आहेत. आणि जालना जिल्ह्याच्या उत्तरेला-बुलढाणा, ईशान्येला-वाशिम, पूर्वेला -हिंगोली, आग्नेयला-परभणी, दक्षिणेला -बीड, पश्चिमेला -औरंगाबाद, आणि वायव्येला –जळगाव हे जिल्हे आहेत. मुलांनो, आता आपण तुमचा जिल्हा राज्याच्या कोणत्या दिशेस किंवा उपदिशेस येतो ते जाणून घेऊ. उदा. तुमचा जिल्हा जर सातारा असेल तर तो राज्याच्या नैऋत्येला आहे, तुमचा जिल्हा ठाणे, पुणे, मुंबई असेल तर तो राज्याच्या पश्चिम दिशेला येईल. अशा तऱ्हेने आपण आपल्या जिल्ह्याचे स्थान दिशा व उपदिशांच्या साहाय्याने ओळखू शकतो.