नकाशा व खुणा

माहीत आहे का तुम्हांला

views

3:52
भूगोलाच्या अभ्यासात नकाशा खूपच महत्त्वाचे साधन म्हणून वापरले जाते. तसेच अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी नकाशा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हे नकाशे तयार करण्याची कला फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. फार पूर्वी अगदी साध्या पद्धतीने नकाशे तयार केले जात होते. परंतु अलीकडील काळात नकाशा तयार करण्याचे शास्त्र व तंत्र खूपच विकसित झालेले आहे. आजच्या काळात नकाशे तयार करण्यासाठी उपग्रहांचा उपयोग केला जातो. हे आजच्या काळात असले तरी प्राचीन काळी आपले पूर्वजदेखील नकाशे तयार करत होते. ते नकाशे जरी आजच्या नकाशाएवढे अचूक व व्यवस्थित नसले तरी ते त्यांना उपयोगी ठरत होते. नकाशे तयार करण्यासाठी पूर्वीचे लोक प्राण्यांची कातडी, हाडे, कवडया, मातीची किंवा दगडाची पाटी इ.चा वापर करत असत. सुमारे ५००० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया नावाचा प्रदेश अस्तित्वात होता. या प्रदेशाचा काही भाग दाखवणारी तेव्हाची – मातीची पाटी (clay Tablet) दाखवली आहे. त्यावरून आपल्याला पूर्वीच्या नकाशांची रचना कशी होती ते समजेल. मुलांनो, मेसोपोटेमिया एक फार प्राचीन भू-प्रदेश आहे.