माझा जिल्हा माझे राज्य

नकाशाशी मैत्री

views

4:26
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना दाखविली आहे. प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक रचना. तुम्हाला समोर आपल्या महाराष्ट्र राज्याचा प्राकृतिक नकाशा दिसतो आहे. यामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना दाखविली आहे. प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक रचना. उदा: नदी, घाट, शिखर इत्यादी. या नकाशाचे बारकाईने निरीक्षण करा व त्याआधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्या राज्यात उत्तर-दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय? आपल्या राज्यात उत्तर-दक्षिण पसरलेला पर्वत म्हणजे सह्याद्री पर्वत होय. या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे? या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास कोकण असे नाव दिले आहे. हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे? तो अरबी समुद्राशी जोडलेला आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात? सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला महाराष्ट्राचे पठार म्हणतात. आपल्या राज्यात उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव काय? आपल्या राज्यात उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती? पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी तापी नदी आहे. वायव्येकडून आग्नेय दिशेकडे वाहणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा. पूर्णा नदी व दुधना नदी सह्याद्री पर्वतातून उगम पावून, अरबी समुद्राला मिळणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा. वैतरणा नदी, उल्हास नदी, सावित्री नदी.