दिवस आणि रात्र

माहीत आहे का तुम्हांला (२१ मार्च आणि २२ सप्टेंबर)

views

3:53
१२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र अशी स्थिती वर्षातून दोन दिवशी आपल्याला पाहायला मिळते. ते दिवस म्हणजे २१ मार्च आणि २२ सप्टेंबर. मुलांनो, २१ मार्च या दिवशी १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असते. २१ मार्च नंतर हळूहळू आपल्याकडे दिवस मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते. असे जूनपर्यंत चालू असते. २१ जूनला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. २१ जूनपासून आपल्याकडे हळूहळू दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. असे २२ सप्टेंबरपर्यंत चालते. परत एकदा २२ सप्टेंबर रोजी १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असते. त्यानंतरच्या काळात पुन्हा दिवस आणखी लहान –लहान होत जातो. दिवस लहान होत असल्याने रात्र आणखी मोठी मोठी होत राहते. असे २२ डिसेंबरपर्यंत चालते. २२ डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. २२ डिसेंबरपासून दिवस पुन्हा मोठा होत जातो. आणि रात्र लहान होत जाते. असे २१ मार्च पर्यंत चालते. परत २१ मार्चपासून हेच चक्र पुन्हा नव्याने सुरू होते. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवे की, १) ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते, त्या काळात उन्हाळा ऋतू असतो. २) आणि ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते, त्या काळात हिवाळा ऋतू असतो. उत्तर भारतात थंडी जास्त असते. हिवाळ्यात उशिरा सूर्योदय असल्याने तिथे थंडीच्या दिवसांत शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु होते. आणि उन्हाळ्यात सूर्योदय लवकर होत असल्याने शाळा लवकर भरते. आपल्याकडे मुंबईत मात्र थंडी कडाक्याची नसल्याने शाळेची वेळ हिवाळ्यात व उन्हाळ्यात सारखीच असते.