पृथ्वीचे अंतरंग

प्रस्तावना, करून पहा

views

3:40
आपण पृथ्वीच्या ज्या भागावर राहतो त्याला पृथ्वीचा पृष्ठभाग असे म्हणतात. तर पृथ्वीचा अंतर्गत भाग म्हणजे जमिनीच्या आतील भाग होय. आज आपण या पाठात पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जालहरी निर्माण होतात व त्या भूपृष्ठाला येऊन थडकतात. त्यांच्या थडकण्याने भूपृष्ठ हादरते किंवा भूपृष्ठाला धक्के बसतात. त्याला ‘भूकंप’ म्हणजेच जमीन हादरणे असे म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना ‘अग्निजन्य खडक’ असे म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते. त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठाच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात. त्यालाच ‘ज्वालामुखी’ म्हणतात. या ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, वायू, धुलीकण, राख इ. पदार्थ बाहेर पडतात. हे पदार्थ द्रव, वायू व घन किंवा स्थायू स्वरूपात असतात. तसेच हे पदार्थ उष्ण असतात.