माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

सांगा पाहू

views

4:52
सांगा पाहू. : मुलांनो, मागील भागात तुम्ही दीपिका आणि राहुल या दोघांचे प्रसंग पाहिले होते. आता या दोन प्रसंगांतून तुम्हाला काय वाटले ते सांगा. मुलांनो, वयस्कर माणसे कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारी असतात. त्यांना अनेक प्रकारची दुखणी आणि आजार असतात. उदा. :- दमा, संधिवात, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार त्यांना असतात. त्यामुळे मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणी लावल्याने त्यांना कधी कधी बैचेन किंवा अस्वस्थ वाटू लागते. खूप गोंगाट, दंगा, आवाज केल्यास त्यांना त्रास होतो. अशा वेळी आपण आवाज कमी केला पाहिजे. तसेच त्यांच्या आसपास शांतता राखली पाहिजे. अशा वेळी आपण त्यांच्याशी प्रेमाने, आपुलकीने बोलल्यास त्यांना आनंद मिळतो. म्हणून मुलांनो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामधून थोडा तरी वेळ आपण आपल्या आजी - आजोबांसाठी काढला पाहिजे. तरच आपण त्यांना खऱ्या अर्थाने समाधानी ठेवू शकतो.