समूहजीवनासाठी व्यवस्थापन

प्रस्तावना

views

4:53
प्रस्तावना: मुलांनो, तुम्ही एखाद्या मोठ्या कारखान्याला किंवा हॉस्पिटलला कधी भेट दिली आहे का? तिथे जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तेथे प्रत्येकजण आपापली कामे करीत असतो. कुठे गडबड नाही की गोंधळ नाही. प्रत्येकजण आपल्या कामात मग्न असतो. कशी बरे एवढी शिस्त त्यांच्यात येऊ शकते? काय करावे लागत असेल त्यांना हे सर्व व्यवस्थितपणे करून घेण्यासाठी? तर मुलांनो, हे सर्व व्यवस्थितपणे चालण्यासाठी व्यवस्थापन अत्यंत गरजेचे असते. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. व्यवस्थापन हे प्रत्येक ठिकाणी असावे लागते. स्वत:साठी, कुटुंबासाठी व समाजासाठीही व्यवस्थापन गरजेचे असते. जर व्यवस्थापन केले नसेल तर गोंधळ कसा उडतो, हे आपण पुढील उदाहरणावरून पाहूयात.