समूहजीवनासाठी व्यवस्थापन

कौटुंबिक किंवा वैयक्तित नियोजन

views

4:39
कौटुंबिक किंवा वैयक्तित नियोजन: मुलांनो, आपण समूहाचे किंवा गटातील नियोजनाचे महत्त्व पाहिले. जसे हे नियोजन गरजेचे असते तसेच कौटुंबिक किंवा वैयक्तित नियीयोजनही गरजेचे असते. उदा: तुमच्या आई वडिलांनी एखाद्या पाहुण्यांना घरी जेवायला बोलावले असेल तरीसुद्धा व्यवस्थापन कारावे लागते. एखाद्याला जेवायला बोलावल्यानंतर तुमचे आईवडील कसे नियोजन करतात याचे तुम्ही निरीक्षण करा. येणारा पाहुणा शाकाहारी आहे की मांसाहारी, जेवायला कोणते पदार्थ बनवायचे, ते जेवण बनविण्यासाठी कोणकोणते सामान लागणार आहे? ते सर्व सामान घरात आहे की विकत आणावे लागणार आहे? पाहुण्यांचे आगत-स्वागत कसे करायचे? अशा खूप छोट्या-मोठ्या गोष्टी तुमचे आईवडील ठरवीत असतात.